जा दिन जनम लीनौ भूपर भौसिला भूप ताहि दिन जीत्यौ अरि-उरके उछाहकौ ।
छठ्ठी छत्रपतिन कौ जीत्यौ भाग जीत्यौ नामकरन में करन के जसके उमाह कौ ।
भूषन भनत बाललीला गढकोट जीते साहिके सिवाजी करि चहूँ चक्क चाहकौ ।
गोलकुंडा, बीजापुर जीत्यौ लरिकाई ही में ज्वानी आए जीत्यौ दिल्लीपति पातशाहको ॥
अर्थ -
ज्या दिवशी जन्म झाला त्याच दिवशी या भोसले भूप शिवाजीने शत्रूंच्या हृदयातील उत्साह जिंकला. 'सहावीस' (महाराष्ट्रात पाचवीस पूजली जाते) त्याने नृपनरेशांचे भाग्य जिंकले. भूषण म्हणतो, बालवयात त्याने गडकोटजिंकले आणि चारी दिशांचा अधिपती व्हावयाची इच्छा केली. पोरवयातच त्याने विजापूर आणि गोवळकोंडाजिंकले आणि तारूण्यात प्रवेश करताच दिल्लींद्रासच जिंकले.
