Thursday, November 12, 2009

शिवजन्म (लक्षण - दोहा)


दसरथ जू के राम भे बसुदेव के गोपाल
सोई प्रगटे साहि के श्री सिवराज भूपाल

अर्थ :-
दशरथाचा राम हाच वसुदेवाचा कृष्ण झाला तोच पुढे शहाजी राजांचा शिवराज नामक राजा झाला.
==========================================
उदित होत सिवराज के, मुदित भए द्विजदेव
कलियुग हट्यो मिट्यो, सकल म्लेच्छन को अहमेव

अर्थ :-
शिवरायांच्या अवतरण्याने देव ब्राह्मण आनंदित झाले. कलियुग नाहिसे झाले
म्लेंच्छाची अहमहमिका जिरली.