Saturday, May 8, 2010

महाराज सिवराज चढत तुरंग पर.......


महाराज सिवराज चढत तुरंग पर ।
ग्रीवा जात नै करि गनीम अतिबल की ।
भूषन चलत सरजा की सैन भूमि पर ।
छाती दरकत है खरी अखिल खल की ।
कियो दौरि घाव उमरावन अमीरन पै ।
गई कटि नांक सिगरेई दिली दलकी ।
सूरत जराई कियो दाह पातसाह उर ।
स्याही जाय सब पातसाही मुख झलकी ॥

अर्थ -

शिवाजी महाराज घोड्यावर बसताच अतिबलाढ्य अशा शत्रूची मान वाकू लागते. भूषण म्हणतो, सरजा (शिवरायांचे)चे सैन्य भूमीवरून चालले असता सर्व दुष्टांच्या छात्या फाटून जातात. दिल्ली दळावर चाल करून अमीर उमरावांवर घाव केल्यामुळे दिल्ली - सेनेचे नाक कापले गेले. सुरत शहर (इकडे) जाळल्यामुळे (तिकडे) बादशहाच्या उरात दाह होऊ लागला व तोंडास काळोखी लागली.

0 comments:

Post a Comment