Sunday, August 29, 2010

शिवजन्म


जा दिन जनम लीन्हो भूपर भुसिल भूप,
ताही दिन जीत्यो अरि-उर के उछाह को ।

छठी छत्रपतिन को जित्यो, भाग अनायास जीत्यो,
नामकरन मे करन-प्रवाह को ।

भूषन भनत बाललीला गढ कोट जीत्यो,
साहि के सिवाजी करि चहूँ चक्क चाह को ।

बीजापूर गोलकुंडा जीत्यो, लरीकाइ ही मै ज्वानी आए,
जीत्यो दिलीपति पातसाह को ॥

ज्या दिवशी भोसले घराण्यात शिवरायांनी जन्म घेतला त्याच दिवशी त्याने शत्रूंच्या अंतःकरणातील उत्साह जिंकला. छटीस* छत्रपतींच्या भाग्यास जिंकले. नामकरणाच्या दिवशी अनायासेच कर्ण-प्रवाहास (अर्थात कर्णाच्या शौर्यादार्याच्या किर्तीरूप प्रवाहास) जिंकले. भूषण म्हणतो, शाहजींच्या शिवरायांनी गड अन् कोट जिंकण्याची बाळक्रिडा केली. आणी चहूकडील अधिपत्य (सार्वभौमत्व) मिळावे अशी इच्छा केली. विजापूर, गोवळकोंडा पोर्वयात जिंकले आणी तारूण्यात प्रवेश करताच दिल्लीपती बादशहास जिंकले.

* छटी - महाराष्ट्रात मूल जन्मल्यावर पाचवे दिवशी विशेष पूजा करतात त्यास 'पाचवीस पुजले' म्हणतात. उत्तरेत अशी पूजा सहाव्या दिवशी करतात म्हणून 'छटी' म्हणतात.

0 comments:

Post a Comment