Thursday, May 26, 2011

स्वधर्म राख्यो घरमें.....




वेद राखे विदित पुरान राखे सार युत रामनाम राख्यो अति रसना सुधरमें

हिंदुंकी चोटी रोटी राखी है सिपाहिंकी, कांधेमें जनेउ राख्यो माला राखी गरमें

मीडि राखे मुगल मरोरी राखे पातसाह, बैरी पीसि राखे बरदान राख्यो करमें

राजन की हद्द राखी तेग बल सिवराज, देव राखे देवल स्वधर्म राख्यो घरमें

अर्थ :-

शिवरायांनी आपल्या तलवारीच्या जोरावर वेद आणि पुराणे यांचे संरक्षण केले. सर्वस्वाचे सार असे जे रामनाम ते
हिंदुंच्या जिभेवर कायम ठेवले. हिंदुंची शेंडी राखली आणि शिपायांची रोटी (उपजिविका) चालवली. खांद्यावरील जानवी आणी गळ्यातील माळा सुरक्षीत ठेवल्या. मोगलांचे यथास्थीत मर्दन केले. बादशाहास मुरगाळून टाकले, शत्रुचे चूर्ण केले. इतके करून आपल्या हाती वर देण्याचा आधिकार ठेवला. देवळात देव घरात कुलधर्म, कुलाचार कायम ठेवले.

0 comments:

Post a Comment