दानव आयौ दगा करि जावली दीह भयारो महामद भार्यौ ।
भूषन बाहुबली सरजा तेहि भेटिबे कौं निरसंक पधार्यौ ।
बीछू के घाय गिरे अफजल्लहि ऊपर ही सिवराज निहार्यौ ।
दाबि यौं बैठो नरिंद अरिंदहि मानौ मयंद गयंद पछार्यौ ॥
अर्थ -
गर्वोन्मत्त आणि भयंकर असा अफजलरूपी राक्षस मोठ्या डामडौलाने, दगा करण्यासाठी आला. भूषण म्हणतो की ते बाहुबली शिवराय त्याही स्थितीत खानास भेटावयास निःशंक गेला. बिचव्याच्या घावाने खाली पडलेल्या अफजलखानावर, जसे नरेन्द्र अरीन्द्रावर बसतो किंवा मृगेंद्र गजेन्द्रावर बसतो तद्वतच शिवराय (अफजलवर) बसले.
उपर्यूक्त छंदाचे वैशिष्ट्य असे की भूषण असे लिहितो की शिवरायांनी अफजलवधासाठी बिचवा वापरला.

0 comments:
Post a Comment