Saturday, August 13, 2011

महाराज सिवराज तुही जगदेव जनक...


आजु यहि समै महाराज सिवराज तुही जगदेव जनक जजाति अम्बरीक सो ।
भूषन भनत तेरे दान-जल जलधि मैं गुनिन को दारिद गयो बहि खरीक सो ।
चन्द कर किंजलक चाँदनी पराग उड-वृंद मकरंद बुन्द पुंज के सरीक सो ।
कुन्द सम कयलास नाक-गंग नाल तेरे जस पुंडरीक को अकास चंचरीक सो ॥

अर्थ -

हे शिवराय ! सांप्रत तुम्हीच जगदेव, ययाति जनक आणि अंबरीष आहांत. भूषण म्हणतो, तुमच्या दान जलाच्या समुद्रात गुणीजनांचे दारिद्र्य गवताच्या काडीप्रमाणे वाहून गेले. तुमच्या यशरूपी कमलावर आकाशरूप भ्रमर आहेत. चंद्रकिरणे ही त्या कमळातील बिसतंतु, चांदणे हा पराग, नक्षत्रे तोच मकरंद, कैलास हे मूळ (कंद) असून आकाशगंगा ही त्या कमळाचा देठ होय.

(उदा.-२ रे - मनहरण दंडक)

0 comments:

Post a Comment